रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला पाठिंबा; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध ! – सुदिन ढवळीकर, मगोप
पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला मगोपचा पाठिंबा आहे; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध आहे, असे मत मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे राज्याला लाभ होणार असल्याचा दावा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी या वेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘परराज्यांतून राज्यात अन्नधान्यांचा पुरवठा होत असतो आणि या वाहतुकीवर मोठा खर्च येतो. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाल्यास हा वाहतूक खर्च घटल्याने राज्यातील अन्नधान्याचे दर घटतील.’’