धुळे येथे पोलिसांनी धर्मांधांकडून ३१ तलवारी कह्यात घेतल्या : दोघांना अटक
तलवारींचा साठा मालेगावातून आणल्याचे उघड
या प्रकरणाचा मालेगावशीही संबंध येत असल्याने पोलिसांनी वरवरची कारवाई न करता याची पाळेमुळे खोदून धर्मांधांविरोधात कठोरात कठोर कारवाई करायला हवी !
धुळे, १० डिसेंबर (वार्ता.) – येथील आझादनगर परिसरातून ३१ तलवारींचा साठा चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांच्या पथकाने कह्यात घेतला असून या प्रकरणी २ धर्मांधांना अटक केली आहे. हा साठा मालेगाव येथून आणून शहरात गंभीर घटना घडवण्याचा उद्देश असल्याचा तर्क पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
Dhule police seize 25 swords, two held https://t.co/R4PIm2dVf6
— TOI Nashik (@TOINashikNews) December 8, 2020
शहरातील सार्वजनिक रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुणांकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. दोन तरुणांकडून एका कापडी पिशवीत असलेल्या २५ तलवारी आणि एक चॉपर असा शस्त्रसाठा पोलीस पथकाने कह्यात घेतला. घटनास्थळावरून शाकीब हुसेन जाकीर हुसेन अन्सारी आणि अरबाज शमीम शेख या दोघांना कह्यात घेतले. दोघांनी आणखी ६ तलवारी अन्य धर्मांधांना विक्री केल्याचे प्राथमिक अन्वेषणात लक्षात आल्याने पथकाने त्यांच्याकडूनही तलवारी जप्त केल्या. या तलवारींचा साठा मालेगाव येथील मुजाहीद आणि त्याचा साथीदार यस्सा यांच्याकडून आणल्याची माहिती समोर आली आहे.