शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक
कुडाळ – शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संजय पडते आणि कुडाळच्या माजी सरपंच सौ. पडते यांचा मुलगा देवेंद्र पडते (वय २८ वर्षे) यांचे गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना ९ डिसेंबरला निधन झाले. १० डिसेंबरला त्यांच्या पार्थिवावर कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण कुडाळ बाजारपेठ बंद ठेवून देवेंद्र यांना कुडाळवासियांनी श्रद्धांजली वाहिली.
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, बहीण, काका, काकी आणि चुलत भावंडे, असा परिवार आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह कुडाळवासियांनी देवेंद्र यांचे अंतिम दर्शन घेतले.