गोध्रा हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा !

न्यायमूर्ती बॅनर्जी यांचा आयोग

गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्याकरता एक आयोग नेमला होता; परंतु त्या आयोगाचा परिणाम होऊ नये; म्हणून लालूप्रसाद यांनी रेल्वे खात्याचा उपयोग करून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बॅनर्जी यांचा आयोग नेमला. न्या. बॅनर्जी यांनी धाडसाने एक अंतरिम अहवाल प्रसिद्ध केला. तो अहवाल बिहार प्रांतात होणार्‍या निवडणुकीच्या अगोदर काही काळच होता. ‘रामसेवकांना बाहेर जाळून मारलेले नाही’, अशा प्रकारचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्याचाच दुसरा अर्थ असा की, रेल्वेमधील ६५ रामसेवकांनी स्वतःच आपल्याला जाळून घेतले, म्हणजे त्यांनी आत्महत्या केली अथवा त्यांनी एकमेकांना जाळून घेतले किंवा आगगाडीलाच आग लागून ६५ रामसेवक जळून गेले. बॅनर्जी अहवालाने नमूद केलेली कारणे केवळ हास्यास्पद होती. राजकीय पुढार्‍यांनी गोध्रा घटनेचा निषेध करण्याकरता किती शब्द वापरले ? हिंदुस्थानमधल्या वर्तमानपत्रांनी जळालेल्या रामसेवकांकरता किती रकाने खर्च केले ? तसेच प्रसिद्ध पाक्षिके आणि मासिके यांनी किती विद्वानांचे लेख प्रसिद्ध केले ? हा खरोखरच एक संशोधनाचा विषय आहे. – अधिवक्ता दादासाहेब बेंद्रे, पुणे

(संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)