पू. (सौ.) अश्विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।
संत ज्ञानेश्वर हे संत, वारकरी नि विठ्ठलभक्तांची ‘माऊली’ असती ।
पू. अश्विनीताई (टीप १) देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ॥ १ ॥
‘माऊली’ आम्हा साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करती ।
‘माऊली’ अन्नपूर्णादेवी होऊनी नित्य भंडारा घालूनी, चैतन्याचा घास आम्हास भरवती ॥ २ ॥
संसार-घर चालवण्याचा पूर्वानुभव नसतांना, बाळगोपाळ साधकांना समवेत घेऊनी ।
‘माऊली’ देवद आश्रमातील साधकांना आईच्या मायेने सांभाळती ॥ ३ ॥
‘माऊली’ आमच्या चुका सांगूनी नि स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेऊनी, साधनेत साहाय्य करती ।
‘माऊली’ आम्हाला सेवा देऊनी, आमच्या साधनेचे उत्तरदायित्व घेती ॥ ४ ॥
‘माऊली’ देवद आश्रमातील सर्व चुकांचे उत्तरदायित्व स्वतःवर घेती ।
सर्व करून-सवरून कर्तेपणा सोडूनी, सर्वांचे श्रेय परम पूज्यांना (टीप २) देती ॥ ५ ॥
‘माऊली’ तीव्र आध्यात्मिक त्रासाशी लढूनी, गुरुसेवा करती ।
स्वतः शिकण्याच्या स्थितीत राहून, आम्हास साधना नि सेवा शिकवती ॥ ६ ॥
‘माऊली’ची कृपा असतांना आम्हास नाही भय, चिंता नि कशाची कमतरता ।
कृतज्ञताभावात राहूनी साधना वाढवूनी, होऊया गुरुकृपेस पात्र आता ॥ ७ ॥
आमची ‘माऊली’ दैवी गुण-रत्नांची खाण असती ।
प्रसंगानुरूप महालक्ष्मी, महासरस्वती नि महाकाली रूपे प्रगटती ॥ ८ ॥
‘माऊली’ने ध्यास घेतला आहे, देवद आश्रमाला हिंदु राष्ट्राचे प्रतीक बनवण्या ।
माऊलींना सद्गुरुमाऊली पदावर आरूढ करावे, हीच परम पूज्यांच्या चरणी प्रार्थना ॥ ९ ॥
टीप १ – पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१०.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |