अकोला येथील वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे !
१५ डिसेंबरला होणार्या विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये सूत्र लावून धरण्याचे आमदार बाजोरिया यांचे आश्वासन
अकोला, १० डिसेंबर (वार्ता.) – १०० भाविकांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तन यांकरिता अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ दिवसांपासून चालू असलेले वारकरी संघटनांचे आमरण उपोषण शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे आमदार रणजीत सावरकर यांच्या आश्वासनानंतर ९ डिसेंबर या दिवशी मागे घेण्यात आले. ‘४ दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, अन्यथा १५ डिसेंबरला चालू होणार्या विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये हे सूत्र लावून धरू’, असे आश्वासन या वेळी आमदार बाजोरिया यांनी वारकर्यांना दिली.
आमरण उपोषणाला बसलेले विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी गुरुवर्य ह.भ.प. अरुण महाराज लांडे यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करून उपोषण मागे घेतले.