(म्हणे) ‘सिंधु संस्कृतीच्या आहारात गोमांसाचे सेवन अधिक होते !’ – संशोधनातील माहिती
|
हिस्सार (हरियाणा) – ‘जर्नल ऑफ अर्कियॉलॉजिकल सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार जगातील सर्वांत प्राचीन मानवी संस्कृती अशी ओळख असलेल्या सिंधु संस्कृतीमध्ये आहारात शाकाहाराऐवजी मांसाहाराचे वर्चस्व होते. तसेच मांसाहारामध्ये गोमांस सर्वाधिक खाल्ले जात होते, असे येथे आढळलेल्या काही अवशेषांवरून दिसून आल्याचे म्हटले आहे. सिंधु संस्कृतीविषयी अद्यापही संशोधन चालू आहे, त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. केंब्रिज विद्यापिठात शिकत असलेल्या अक्षेता सूर्यनारायणन् या पी.एचडी. स्कॉलर विद्यार्थीनीने हे संशोधन केले आहे. तिच्या प्रबंधामध्ये तिने ‘लिपिड रेसिड्युसेस इन पॉटरी फ्रॉम दी इंडस सिव्हिलायझेशन इन नॉर्थवेस्ट इंडिया’ या शिर्षकाखाली ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु आणि प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे, बनारस हिंदु विद्यापिठाचे प्रा. रवींद्र सिंह त्याचसमवेत केंब्रिज विद्यापिठाचे मरिअम कुबा, ऑलिव्हर ई क्रेग, कार्ल पी. हेरॉन, तमसीन सी ओ कोनेल, कॅमेरॉन ए पॅट्री हे सर्व संशोधक या अभ्यासाचे सहलेखक आहेत.
A new study has shed some light on the culinary habits of the people who lived in the Indus Valley, some 4,500 years ago.https://t.co/Lgk6TRUBXJ
— Indiatimes (@indiatimes) December 10, 2020
१. सूर्यनारायणन् हिने सांगितले की, सिंधु संस्कृतीच्या कालात कुठले अन्न शिजवले जात होते, हा त्यांच्या पी.एचडी.चा विषय आहे. त्यामध्ये येथे सापडलेल्या ‘लिपिड’ नावाच्या एका स्निग्ध पदार्थाच्या अवशेषांच्या अभ्यासातून शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२. उत्खननात पाळीव प्राण्यांपैकी गुरे, म्हशी यांचे सर्वाधिक प्रमाणात आढळून आले आहे; कारण या प्राण्यांची सरासरी ५० ते ६० टक्के हाडे आढळून आली आहेत. तसेच १० टक्के मेंढ्या, बकर्यांची हाडे आढळून आली आहेत. गोवंशाच्या हाडांच्या उच्च प्रमाणावरून सिंधु संस्कृतील लोकांची गोमांसांला अन्न म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. (केवळ गुरांच्या हाडांवरून असा निष्कर्ष काढणे अत्यंत चुकीचे आहे. पूर्वीच्या काळात हिंदू मोठ्या प्रमाणात गोपालन करत होते. सिंधु संस्कृती अचानक लुप्त झाली आहे. त्या वेळी हे गुरे मृत्यूमुखी पडल्यामुळे त्यांची हाडे आता सापडत आहेत, असेच लक्षात येते !- संपादक)