बुर्ली-खोलेवडी येथे कृष्णा नदीवरील पूल केंद्रीय रस्ते फंडातून करावा ! – ग्रामस्थ आणि भारतीय किसान संघाची मागणी
सांगली, १० डिसेंबर – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली-खोलेवाडी दरम्यान कृष्णा नदीवर पूल व्हावा, अशी मागणी बर्याच वर्षांपासूनची तेथील ग्रामस्थांची आहे. त्यामुळे सदर पूल केंद्रीय रस्ते फंडातून व्हावा, असे निवेदन भारतीय किसान संघाचे प्रांत संघटनमंत्री चंदनदादा पाटील यांना भारतीय किसान संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब पिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष महावीर कर्वे, जिल्हा मंत्री उदय राजोपाध्ये, ग्रामस्थ यांनी दिले. या वेळी राजाभाऊ मदवाने, सरपंच राजेंद्र चौगुले, अध्यक्ष बी.एन्. पाटील, अप्पासाहेब सूर्यवंशी उपस्थित होते.