सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे यांचे निधन
ठाणे – सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र प्रमोद शिंदे (वय ६५ वर्षे, रहाणार कळवा, जिल्हा ठाणे) यांचे ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.५० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुलगे आणि २ सुना असा परिवार आहे. सनातन परिवार शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.