ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला शिर्डी संस्थानने लावलेल्या फलकाचे रक्षण करणार !
पुणे – शिर्डी संस्थान यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व साई भक्तांनी स्वागत केले आहे, असे असतांनाही काही विकृती त्यांचा विरोध करत आहेत. शिर्डी येथे जाऊन फलक काढण्याची भाषा करत आहेत. शिर्डी संस्थानच्या समर्थनार्थ तसेच तेथे लावलेल्या फलकाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला त्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून थांबतील.
– आनंद दवे, संस्थापक अध्यक्ष ब्राह्मण महासंघ
पुणे येथून ५० महिला शिर्डी येथे जात आहेत. त्यांनी लाल महाल येथे जिजाऊ मातांचा आशीर्वाद घेतला. या प्रसंगी महिला आघाडीच्या समन्वयक तृप्ती तारे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.