आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी !
वॉशिंग्टन (अमेरिका) – पृथ्वीवरील भूमीमध्ये भाजीचे उत्पादन घेण्यात येते, तसे आता अवकाशातही भाज्यांचे उत्पादन घेण्यास चालू झाले, तर आश्चर्य वाटणार नाही, अशी घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली आहे. महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले. हे मुळे २०२१ मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.
WATCH | Astronaut harvests first radish crop grown aboard the International Space Station.https://t.co/wnLy2NbXe9
— TIMES NOW (@TimesNow) December 6, 2020
१. वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते. त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एल्इडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके आणि खते, तसेच ऑक्सिजन देण्यात आला. मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ २७ दिवस लागतात. त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती.
२. आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे. अवकाशविरांना ताजे अन्न मिळावे आणि ‘तेथे वनस्पतींची वाढ कशी होते’ याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.