कर्तव्यावर नसणार्या ८ वैद्यकीय अधिकार्यांना आयुक्तांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
नवी मुंबई – वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये कामावर अनुपस्थित असणार्या ८ वैद्यकीय अधिकार्यांना महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कामकाजाची माहिती घेण्यासाठी बांगर यांनी ८ डिसेंबर या दिवशी या रुग्णालयाला अचानक भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. उपस्थिती पत्रकात त्यांच्या यापूर्वीच्या काळातील उपस्थितीच्या स्वाक्षरीही नसल्याचे आढळले. त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्णालयातील शौचालयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचे लक्षात आल्यावर ‘स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे’, अशी सूचनाही त्यांनी दिली. (अशी सूचना का द्यावी लागते ? – संपादक) ‘यापुढेही रुग्णालयांचा अचानक पहाणी दौरा करण्यात येईल’, अशी माहिती अभिजीत बांगर यांनी दिली.