फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करणार्या धर्मांधांच्या मृतदेहाची त्याच्या चेचन्या येथील गावी काढण्यात आली अंत्ययात्रा !
मुसलमानबहुल चेचन्यामध्ये कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत, हे लक्षात येते ! जगात असे किती ठिकाणे आहेत, याचा विचार करून त्यांना बहिष्कृत करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
नवी देहली – काही आठवड्यांपूर्वी फ्रान्समध्ये सॅम्युअल पॅटी या शिक्षकाची धर्मांध विद्यार्थ्याने गळा चिरून हत्या केली होती. पॅटी यांनी वर्गामध्ये महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवल्याच्या रागातून १८ वर्षीय अब्दुल्लाख अँजोरोवया या विद्यार्थ्याने त्यांची हत्या केली. पोलिसांनी त्याला त्याच दिवशी चकमकीत ठार केले होते.
(सौजन्य : डेली मेल)
अब्दुल्लाख मूळचा रशियातील चेचन्यामधील असल्यामुळे त्याचा मृतदेह त्याच्या देशामध्ये पाठवण्यात आला होता. ५ डिसेंबरला त्याच्या शालाजी या गावामध्ये त्याचा मृतदेह आणण्यात आल्यावर त्याला एका नायकाप्रमाणे सन्मान देण्यात आला. त्यासाठी गाणेही गायिले जात होते. त्याच्या अंत्ययात्रेमध्ये शेकडो लोकांचा सहभाग होता.
Paris beheading case: Amidst chants of ‘Allahu Akbar’, terrorist was called ‘lion of Islam’, given hero’s funeral in Chechnyahttps://t.co/ferxhFu72f
— OpIndia.com (@OpIndia_com) December 7, 2020
या वेळी ते ‘इस्लामचा वाघ’ अशा घोषणा देत होते. संपूर्ण गावातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गावकर्यांनी गावातील एका रस्त्याला त्याचे नावही दिले आहे. या वेळी पोलिसांनी दुसर्या गावातून लोक येऊ नयेत; म्हणून सीमा सील केल्या होत्या.