उसगाव येथील शिक्षिका कोरोनाबाधित
१० वी आणि १२ वीचे वर्ग रहित
फोंडा, ८ डिसेंबर (वार्ता.) – ज्येष्ठ शिक्षिका कोरोनाबाधित झाल्याने उसगाव, फोंडा येथील विद्यालयाचे इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग एक आठवड्यासाठी रहित करण्यात आले आहेत. या शिक्षिकेच्या संपर्कात आलेले शिक्षक आणि विद्यार्थी यांना घरी अलगीकरणात रहाण्यास सांगण्यात आले आहे, तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.