चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा विवाह सुनिश्चित झाल्याची आनंदवार्ता ऐकल्यावर कवितांच्या माध्यमातून त्यांच्या सहसाधकांचा झालेला संवाद
३.१२.२०२० या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. संदीप शिंदे आणि कु. स्वाती गायकवाड यांचा विवाह सुनिश्चित झाल्याची आनंदवार्ता त्या दोघांच्या समवेत सेवा करणार्या काही साधकांना सांगितली. तेव्हा ‘ही आनंदवार्ता ऐकून उभयतांना काय वाटले ?’, असे त्यांनी त्या दोघांना विचारले. या वेळी नेहमी शीघ्रतेने कविता करणारे श्री. संदीप आणि कु. स्वाती यांना काही सुचेनासे झाले. त्या वेळी सहसाधकांसह त्यांचा कवितारूपातून झालेला भावसंवाद पुढे दिला आहे.
१. श्री. संदीप शिंदे
निभावत आलो आजवर अनेक नाती ।
गुरुचरणी जाण्या लाभली मजला स्वाती ॥
२. श्री. अरविंद पानसरे
काही सुचेना, काही कळेना, आनंदाला पारावार न उरला ।
सद्गुरूंच्या चरणी ‘संदीप-स्वाती’चे नाते जुळण्याचा योग आला ॥
३. कु. मेघा चव्हाण आणि कु. मृण्मयी गांधी
श्री महालक्ष्मीने दिली आनंदवार्ता । सनातनचा सं‘दीप’ उजळला ।
‘स्वाती’ची कळी खुलली ॥ १ ॥
स्वाती नक्षत्रातील पावसाने शिंपल्यात होतो मोती ।
संदीप-स्वाती हे दोन मोती विराजू दे श्रीविष्णूच्या मुकुटी ।
हीच प्रार्थना गुरुचरणी ॥ २ ॥
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |