प्रतिलिटर पेट्रोलचे मूल्य ४० रुपये असले पाहिजे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
नवी देहली – ९० रुपये मूल्य असणार्या प्रतिलिटर पेट्रोलमध्ये त्याचे मूळ मूल्य केवळ ३० रुपये असते; मात्र त्यानंतर विविध कर, पेट्रोल पंपचे कमिशन आणि अन्य खर्च ६० रुपये असतो. त्यामुळे त्याचे मूल्य ९० रुपये होते. माझ्या मते प्रतिलिटर पेट्रोलचे मूल्य ४० रुपये असले पाहिजे, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.
Petrol price at Rs. 90 per litre is a monumental exploitation by GoI of the people of India. The price ex-refinery of petrol is Rs. 30/litre. All kinds of taxes and Petrol pump commission add up the remainder Rs.60. In my view petrol must sell at max. Rs. 40 per litre.
— Subramanian Swamy (@Swamy39) December 7, 2020
याला सामाजिक माध्यमांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. वर्ष २०१२ मध्ये पेट्रोलचे मूल्य ६७ रुपये झाले होते. तेव्हा भाजपकडून याचा विरोध करण्यात आला होता.