कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला शालेय बसव्यवसाय आर्थिक संकटात
पुणे – कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे राज्यातील ५२ सहस्रांहून अधिक शालेय बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे मालक, चालक आणि साहाय्यक यांसहित दीड लाख लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला हा एकमेव व्यवसाय आहे. व्यवसाय ठप्प असल्याने गेल्या ७ मासांपासून वेतनही मिळालेले नाही. तसेच शाळा चालू झाल्यानंतर शालेय बसगाड्यांची क्षमताही अल्प होण्याची शक्यता असल्याने बस भाड्यात होणार्या वाढीचा भुर्दंड पालकांनाच सोसावा लागणार आहे. परत बस सेवा चालू करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती यांवरही मोठा व्यय करावा लागेल. त्यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत.