मिग-२९ विमान दुर्घटनेतील दुसर्या वैमानिकाचा मृतदेह सापडला
पणजी – आय.एन्.एस्. विक्रमादित्यवरून उड्डाण केल्यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात मिग-२९ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत २ पैकी एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.
Body of missing Navy pilot Commander Nishant Singh found in Arabian Sea#Video #MiG29Khttps://t.co/AURme1iD7z
— IndiaToday (@IndiaToday) December 7, 2020
दुसर्या वैमानिकाचा गेले ११ दिवस शोध लागत नव्हता. त्याचा मृतदेह ७ डिसेंबरला गोव्याच्या समुद्रकिनार्यापासून ३० मैलांवर, तसेच ७० मीटर पाण्याखाली अथक शोधमोहिमेअंती सापडला. या वैमानिकाचे नाव निशांत सिंह असे आहे.