तम्नार वीज प्रकल्पाला मोले ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती न्यायालयाकडून रहित
पणजी – सांगोड येथे उभारण्यात येणार्या तम्नार वीजप्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाने रहित केली आहे. मोले पंचायतीच्या सरपंचांनी ग्रामपंचायतीत याविषयी ठराव न घेताच ही अनुज्ञप्ती दिल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पासाठीच्या बांधकामासाठी अनुज्ञप्ती मागणारा अर्ज पंचायत मंडळासमोर ठेवण्यात येईल.