‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्यांना लुटणार्या दलालांना पाठिंबा !
पणजी – संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकाला विरोध म्हणून देशभरात शेतकर्यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’चा गोव्यात कोणताही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी यांनी मात्र या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदला अनुसरून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवावी अन् शांतता राखावी, अशी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.