बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी
समाजातील वाढती गुन्हेगारी हे अराजकाचे द्योतक !
कुडाळ – तालुक्यातील तिवरवाडी (हळदीचे नेरूर) येथील युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी शनिवार, ५ डिसेंबरला रात्री केतन प्रमोद आगलावे, शिवाजी सुरेश घाडी, सुनील लक्ष्मण राऊळ आणि अमरेश काशिनाथ कविटकर या माणगाव खोर्यातील ४ संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या. या चौघांना येथील न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.