रामनाथी आश्रमात झालेल्या ‘उग्र प्रत्यंगिरायागा’च्या वेळी शरिरांत होणार्या वेदना नष्ट झाल्याचे अनुभवणे
‘४.११.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘उग्र प्रत्यंगिरा याग’ झाला. तेव्हा मला देवीचे मुख सिंहरूपात दिसत होते. ‘त्या वेळी देवी माझी पाठ, पाय आणि पोटर्या पहात आहे. देवी त्या भागातील अनिष्ट शक्ती बाहेर काढत आहे’, असे मला जाणवले. हे सर्व क्षणार्धात घडत होते. त्या दिवसापासून माझी पाठ, कंबर आणि पाय यांत होणार्या वेदना नष्ट झाल्या.’
– कु. दीपाली गोवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |