पुण्यातील नोबेल रुग्णालयात रशियन बनावटीच्या लसीची दुसर्या टप्प्यातील चाचणी चालू
पुणे – ‘गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इपीडेमीओलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजी’ आणि ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ (आर्.डी.आय.एफ्.) हे एकत्रितरित्या ‘स्फुटनिक-५’ ही लस सिद्ध करत आहेत. भारताने रशियाकडून या लसीचे १० कोटी डोस खरेदी केले आहेत. मानवी चाचणीच्या वेळी १७ चांगली शारीरिक क्षमता असलेल्या स्वयंसेवकांना गेल्या ३ दिवसांत ‘स्फुटनिक-५’ या लसीचे डोस देण्यात आले आहेत. या चाचणीमध्ये ‘ट्रायल प्रोटोकॉल’चे पूर्णपणे पालन केले असून या सर्वांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले आहे. त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असून प्रकृती उत्तम आहे.