कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकही मृत्यू नाही ; रुग्णसंख्याही घटली
कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे होणार्या संसर्गासाठी आशादायी चित्र असून कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकही मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्णसंख्याही घटली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या २० च्या आत आली आहे. घटत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केंद्रही बंद होत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण आता अत्यल्प झाला आहे. हळूहळू आता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अन्य विभाग हे कोरोना सोडून अन्य रुग्णांसाठी चालू करण्यात येत आहेत.