नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
भूमीपूजन करण्यास अनुमती
नवी देहली – येत्या १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्या नव्या संसद भवनाच्या बांधकामालाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र भूमीपूजन करण्यास कोणतीही अडचण नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
SC expresses displeasure over Central Vista project but allows foundation-laying of new #Parliament building.
Watch what Senior Advocate Sanjay Hegde (@Sanjayuvacha2) has to say! @saharzaman #CentralVista #CentralVistaProject pic.twitter.com/m3FLcDA7mL
— Mirror Now (@MirrorNow) December 7, 2020
‘सेंट्रल विस्ता’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. संसदेच्या पुनर्बांधणीच्या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.