आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू, तर २९२ जण आजारी
अमरावती (आंध्रप्रदेश) – संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतांना आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये एका अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर २९२ हून अधिक लोक आजारी पडले आहेत.
A mysterious disease that began spreading in Eluru in Andhra Pradesh claimed one life on Sunday while 292 others fell sick. https://t.co/qCHTNwcZN9
— News18 (@CNNnews18) December 7, 2020
पश्चिमी गोदावरी जिल्ह्यामध्ये १४० रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे, तर अन्यांची स्थिती स्थिर आहे. या आजारामुळे अस्वस्थ वाटणे, ‘फीट’ येणे आदी त्रास होत आहेत. फीटमुळे एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे