शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद
श्रीरामपूर (नगर) – कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी कामगार संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. कामगार नेते नागेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली एम्.आय.डी.सी. कामगार, हमाल- माथाडी कामगार, महाबीज कामगार, सिमेंट कामगार संघटना, पेठ हमाल माथाडी कामगार, शेत कामगार, हातगाडी कामगार आणि रिक्शा कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. नागेश सामंत यांच्यासह ६ आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.