‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !
हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !
मुंबई – येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी काढलेली चित्रे विक्रीसाठी ठेवली होती.
मुंबई स्थित https://t.co/bmELkeMTlS से हो रही है भारतमाता एवं हिन्दू देवी-देवताओं के नग्न चित्र निकालनेवाले हिन्दुद्रोही चित्रकार MF Husain के चित्रों की ऑनलाइन बिक्री
वैध मार्ग से विरोध कर इसे हटाने की मांग करें
Email : customerservice@kalpavraksha.com
Whats App : 9820054626 pic.twitter.com/vCx52w0eSm
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) December 5, 2020
याविषयी धर्मप्रेमींनी विरोध केल्यावर, तसेच हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन करणारे पत्र पाठवल्यानंतर या आस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र याविषयी धर्माभिमानी हिंदूंनी ई-मेल आणि व्हॉट्सअॅप यांच्या माध्यमांतून वैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर या आस्थापनाने हुसेन यांची चित्रे विक्रीतून काढून टाकली आहेत.