सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना श्री. अनंतजी गुरुजी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
१. श्री. अनंतजी गुरुजी यांच्याकडे पाहून ते मागील जन्मी ऋषि होते आणि त्यांची ध्यानयोगानुसार साधना आहे, असे जाणवले. त्यामुळे त्यांना योग आणि प्राणायाम यांविषयी ज्ञान मिळते.
२. त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी आत्मज्योत दिसली. यातून त्यांचे कुंडलिनीचक्र जागृत असून ते आज्ञाचक्रापर्यंत आलेले आहे. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद आणि चांगली होत आहे, असे जाणवते.
३. त्यांच्यावर देवी, शिव, दत्त आणि गणपति अशा ४ देवतांची कृपा असून त्यामुळे त्यांना योग, प्राणायाम आदींविषयी विविध ज्ञान मिळते.
४. श्री. अनंतजी गुरुजी यांचा अहं पुष्कळ अल्प असल्यामुळे त्यांच्यावर दैवी कृपा होते आणि त्या माध्यमातून त्यांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते.
५. त्यांच्यामध्ये विनम्रता आणि समष्टीचे कल्याण करण्याची तळमळ पुष्कळ असल्यामुळे दैवी शक्ती त्यांच्या माध्यमातून उपचार करतात.
६. ते कर्मयोग आणि ज्ञानयोग या मार्गानुसार साधना करणारे असून त्यांना ईश्वराकडून म्हणजेच विश्वबुद्धीतून योग अन् प्राणायाम यांविषयी ज्ञान मिळते.
७. श्री. अनंतजी गुरुजी यांची शिकण्याची वृत्ती चांगली आहे.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(६.१२.२०२०)
इतरांचा विचार करणारे श्री. अनंतजी गुरुजी !
श्री. अनंतजी गुरुजी हे योग आणि प्राणायाम शिकवतांना इतरांचा विचार करतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, इतरांना सहज ज्ञान देणे आदी अनेक गुण आहेत. शरीर सदृढ रहाणे अन् मन शांत राखणे यांसाठी ते योग आणि प्राणायाम शिकवतांना अध्यात्माचे अंग म्हणजे चांगली साधना होण्यासाठीही मार्गदर्शन करतात. त्यांनी येथील सनातन आश्रमातील साधकांना योग आणि प्राणायाम आनंदाने अन् सहजतेने शिकवले. – सौ. अक्षता रेडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
श्री. अनंतजी गुरुजी यांचा परिचयश्री. अनंतजी गुरुजी हे तुमकूर (कर्नाटक) येथील असून त्यांनी ‘योग विस्मय ट्रस्ट’ स्थापन केला आहे. ते गेली ९ वर्षे सात्त्विक आहार, योग आणि विविध घरगुती औषधी वनस्पती यांचा अभ्यास करत आहेत अन् त्यांचा या सर्वांविषयी सखोल अभ्यास आहे. कर्नाटकातील ‘प्रजा’ वाहिनीवर श्री. अनंतजी गुरुजी यांची योग आणि प्राणायाम यांवर आधारित मालिका चालू असून त्याचे ३५ भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी सहस्रो डॉक्टरांना त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाविषयी मार्गदर्शन केले आहे, तसेच त्यांनी योग आणि घरगुती औषधे यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रोगमुक्त केले आहे. श्री. अनंतजी गुरुजी यांचे ७० ते ८० लाख अनुयायी आहेत, तसेच ‘फेसबूक’च्या माध्यमातून त्यांचे योग आणि प्राणायाम यांच्या ध्वनीचित्रफिती पहाणारे ३ कोटी दर्शक (व्ह्यूव्हर्स) आहेत. श्री. अनंतजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार ९० लाख जण आचरण करत आहेत. |
नम्र आणि इतरांचा विचार करणारे श्री. अनंतजी गुरुजी !
१. ‘श्री अनंतजी गुरुजी हसतमुख आणि आनंदी असतात. त्यांना पाहिल्यावर प्रसन्न वाटते.
२. ते नम्रतेने बोलतात.
३. ‘बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटणे
आम्हाला कन्नड भाषा येत नाही. त्यांचे कन्नड भाषेतील बोलणे आम्हाला समजत नसले, तरी ‘ते पुष्कळ शुद्ध बोलत आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. ‘त्यांचे बोलणे अतिशय शुद्ध आहे’, असे कन्नड भाषा जाणणार्या साधकांनी सांगितले. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे आम्हाला वाटत होते.
४. त्यांचा लोकसंग्रह पुष्कळ मोठा आहे.
५. चित्रीकरणाची चांगली जाण असणे
ते चित्रीकरणाच्या वेळी छायाचित्रकासमोर आत्मविश्वासाने बोलत होते. चित्रीकरणात खंड पडल्यास ते पुन्हा नीट जुळवून घेत होते. ‘त्यांना छायाचित्रकासमोर बोलण्याचा १० वर्षांपासूनचा अनुभव आहे’, असे समजले.’
– श्री. मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६. इतरांचा विचार करणे
‘ते घेणार असलेल्या योगासनांच्या वर्गाचे चित्रीकरण करायचे होते. ‘जागेत किती साधक बसतील ? त्यांना कसा ‘सेटअप’ हवा आहे ?’, याविषयीच्या गोष्टी स्पष्ट झाल्या, तर चित्रीकरणाची सिद्धता करण्यासाठी सोपे जाते. श्री. अनंतजी यांना त्याविषयी चित्रीकरणातील साधकांनी विचारण्यापूर्वीच त्यांनी स्वतःहून वर्गाचा सराव घ्यायला सांगितला.’ – वर्गाला उपस्थित असणारे साधक
७. परेच्छेने वागणे
‘त्यांनी रामनाथी आश्रमातील वैद्य साधकांना योगासने शिकवली. साधकांनी त्यांना ‘आम्हाला अमुक गोष्टी शिकायच्या आहेत’, असे सांगितल्यावर त्यांनी ते लगेच स्वीकारून मोकळेपणाने शिकवले. त्यांचा ‘स्वतःच्या मताप्रमाणे व्हायला हवे’, असा कुठेही आग्रह नव्हता.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर
८. भाव
अ. ‘त्यांच्या तोंडवळ्यावर भाव जाणवतो.
आ. ते समाजातील व्यक्तींसाठी मोठी शिबिरे घेतात; मात्र त्यांनी आश्रमातील साधकांसाठी सर्वकाही विनामूल्य शिकवले. त्यांनी सर्व साधकांसाठी ७ दिवसांचे शिबिर घेण्याची इच्छा व्यक्त केली, तसेच माझ्या गुरूंनी मला जे ज्ञान शिकवले, ते मी निःस्वार्थी वृत्तीने सर्वांना देईन’, असेही ते म्हणाले.
– वर्गाला उपस्थित असणारे साधक (५.१२.२०२०)
तुमकूर (कर्नाटक) येथील ‘योग विस्मय ट्रस्ट’चे योगप्रशिक्षक अनंतजी गुरुजी यांची कन्या चि. लहरी हिच्याविषयी वैशिष्ट्यपुर्ण मजकूर वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! https://sanatanprabhat.org/marathi/428925.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |