मणचे येथे होडी उलटल्याने एकाचा मृत्यू, ५ जण वाचले
देवगड – तालुक्यातील मणचे येथील खाडीपात्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत तळेरे येथील ‘मेडिकल’ व्यावसायिक महावीर उपाख्य मनोज रवींद्र पोकळे (वय ४० वर्षे) यांचा बुडून मृत्यू झाला. जलविहारासाठी ते कुटुंबियांसमवेत होडीने खाडीपात्रात गेले होते. या घटनेत त्यांच्यासमवेतचे ५ जण सुदैवाने वाचले आहेत. ही घटना ५ डिसेंबरला घडली.