अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार करणार्या २ युवांवर गुन्हा नोंद
ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम !
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – फलटण (जिल्हा सातारा) शहरातील १६ आणि १७ वर्षे वयाच्या २ मुलांनी ८ आणि ९ वर्षे वयाच्या २ अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.
आरोप असणार्या दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सातारा येथील बालसुधारगृहामध्ये त्यांची पाठवणी करण्यात आली आहे.