(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’
भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे विधान
|
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – आंदोलनांमध्ये बळाचा वापर करून ती दडपून टाकणे चुकीचे आहे; कारण लोकांना शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अधिकार्यांनी त्यांना निदर्शने आणि शांततामय आंदोलन करू द्यावे, त्यांच्यावर दडपशाही करू नये, हेच आमचे भारतालाही सांगणे आहे, असे विधान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुट्रेस यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले होते, ‘काही देशांच्या नेत्यांनी चुकीच्या माहितीवर अनावश्यक मते व्यक्त केली आहेत.’ यावर गुट्रेस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
After several UK parliamentarians and Canadian Prime Minister @JustinTrudeau, the United Nations (@UN) chief has come out in support of farmers protest in Indiahttps://t.co/ISAFmbYIeG
— WION (@WIONews) December 6, 2020
संयुक्त राष्ट्रांचे आणखी एक सरचिटणीस स्टिफन डुजारिक हे पत्रकारांनी विचारलेल्या आंदोलनाविषयीच्या प्रश्नावर म्हणाले की, आम्ही लोकांना स्वतःसाठी आवाज उठवतांना पाहू इच्छितो. लोकांना शांततापूर्ण पद्धतीने निषेध आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि अधिकार्यांनी त्यांना तसे करू द्यायला हवे.
भारताने समज दिल्यानंतरही जस्टिन ट्रूडो यांचे शेतकर्यांना समर्थन
ओट्टावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडो यांनीही शेतकर्यांच्या आंदोलनावर त्यांच्या समर्थनार्थ विधान केले होते. त्यावर भारताने त्यांना उद्देशून समज दिली होती; मात्र तरीही त्यांनी पुन्हा एकदा या आंदोलनाचे समर्थन केले आहे.
Trudeau again comments on farmers protest https://t.co/5AIjxk3Dfi
— TOI Top Stories (@TOITopStories) December 5, 2020
ते म्हणाले की, शांततापूर्ण निदर्शने करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. जगात कोठेही शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, तरी त्याला माझा पाठिंबा असेल.