‘मराठा विकास प्राधिकरणा’च्या विरोधात कर्नाटकमध्ये कन्नड संघटनांचा राज्यव्यापी बंद
बंद म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! यामुळे देशाचीही वित्तहानी होते. यामुळे अशी आंदोलने करणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यामध्ये भाजप सरकारने ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्या विरोधात राज्यातील कन्नड संघटनांनी ५ डिसेंबरला राज्यव्यापी बंद पुकारला होता. या संघटनांकडून लोकांना बंद पाळण्याचे बलपूर्वक आवाहन करतांना पोलिसांनी अनेकांना कह्यात घेतले.
Karnataka: Pro-Kannada organisations have called for a bandh today against state govt’s decision to form Maratha Development Authority. Visuals from Shivaji Nagar in Bengaluru. pic.twitter.com/VmCrbXqX1c
— ANI (@ANI) December 5, 2020
बेंगळुरू पोलिसांनी कन्नड संघटनांच्या १०० हून अधिक लोकांना कह्यात घेतले. बेंगळुरूच्या शिवाजीनगरमध्ये सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली.