मऊ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न
‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ?’ हा प्रश्न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !
मऊ (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु युवतीला ‘राहुल’ नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शबाब नावाच्या तरुणावर आणि त्याच्या कुटुंबातील १४ जणांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणीचा १ डिसेंबर या दिवशी विवाह होणार होता. त्यापूर्वी शबाब तिला पळवून नेणार होता.