साळगाव येथे आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस
गोवा म्हणजे अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय, ही प्रतिमा पालटायला हवी !
पणजी – गुन्हे अन्वेषण विभागाने साळगाव येथील व्हॅली व्हीव रिसोर्टमधून कार्यरत असलेले आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे. संकेतस्थळ आणि ‘ऑनलाईन’ विज्ञापने यांच्या माध्यमातून हे रॅकेट चालू होते. या धाडीत करंझाळे येथे इस्माईल याला कह्यात घेण्यात आले आहे. हे संपूर्ण रॅकेट राझ उपाख्य निशांत कपूर हा मोहाली, चंडीगड, पंजाब येथून चालवत होता. पंजाब पोलिसांच्या सहकार्याने निशांत कपूर याल चंडीगढ येथून कह्यात घेण्यात आले आहे. या धाडीच्या वेळी ४ महिलांची सुटका करण्यात आली.