मुख्यमंत्र्यांचा १९१ पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद
गोवा राज्य आत्मनिर्भर करण्यावर दिला भर
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ५ डिसेंबर या दिवशी राज्यातील १९१ पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला. ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’, या योजनेचाच हा एक भाग होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी गोवा राज्य आत्मनिर्भर करण्यावर पंचायत मंडळांनी भर द्यावा, असे आवाहन केले. गोवा आत्मनिर्भर करण्यासाठी एकूण १६ विविध सूत्रांवर या वेळी भर देण्यात आला. पंचायत मंडळांनी ग्रामीण भागातील लोकांच्या उद्धारासाठी केंद्र आणि राज्य शासन यांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.