काणकोण आणि नागोवा येथून अमली पदार्थ कह्यात
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – काणकोण पोलिसांनी गालजीबाग, काणकोण येथे एका कारवाईत मूळचा पश्चिम बंगाल येथील एक नागरिक त्रिदीप नंदी याच्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले. संशयित त्रिदीप नंदी गेले दीड मास गोव्यात वास्तव्यात होता. गुन्हे अन्वेषण विभागाने नागोवा येथील फुटबॉल मैदानाजवळ कारवाई करतांना मूळचा ओडिसा येथील संशयित मिथून याच्याकडून सुमारे २ किलो गांजा आणि ९० ग्रॅम चरस कह्यात घेतले.