दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवून (उन्हात ठेवून) त्यांची आध्यात्मिक शुद्धी करा !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘प्रत्येक वस्तूला तिच्या गुणधर्माप्रमाणे चांगली किंवा वाईट स्पंदने असतात. आपल्या अवतीभोवती आणि वापरात असलेल्या अनेक वस्तूंच्या स्पंदनांचा आपल्यावर सतत परिणाम होत असतो. अन्य कोणत्याही वस्तूंपेक्षा अंगावरच्या कपड्यांचा आणि आपला निकटचा संबंध असतो. सध्या रज-तमाचे प्राबल्य वाढल्याने वायूमंडल दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम व्यक्तीवर होतो, तसेच तिच्या दैनंदिन वापरातील कपड्यांवरही होतो. रज-तमात्मक स्पंदनांनी भारित झालेले कपडे तसेच वापरल्यास व्यक्तीला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते किंवा तिच्या त्रासांत वाढ होते. यावर उपाय म्हणून दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवावे, म्हणजे ते काही वेळ उन्हात ठेवून मग वापरावे. ‘कपड्यांना ऊन दाखवल्याने कपड्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १३.११.२०२० या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्या दैनंदिन वापरातील कपड्यांना (सदर्यांना) २० मिनिटे ऊन दाखवण्यात आले. कपड्यांना ऊन दाखवल्याने कपड्यांवर झालेला सकारात्मक परिणाम पुढे दिला आहे.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्या कपड्यांना ऊन दाखवल्यावर त्या कपड्यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
टीप – ‘ऑरा स्कॅनर’ने ४० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या सदर्यातील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सदर्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
२. निष्कर्ष
साधकांच्या कपड्यांना (सदर्यांना) ऊन दाखवल्याने त्यांच्या कपड्यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवल्याने त्यांची (कपड्यांची) आध्यात्मिक शुद्धी होणे : समस्त विश्वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! उन्हात कपडे ठेवल्याने सूर्याची तेजोमय अन् चैतन्यमय किरणे त्यांवर पडतात. यामुळे कपड्यांतील रज-तमात्मक स्पंदने नाहीशी होऊन कपडे सकारात्मक स्पंदनांनी भारित होतात. चाचणीतील पहिल्या साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने त्याचे कपडे त्रासदायक स्पंदनांनी भारित झाले होते. त्याने २० मिनिटे त्याचा सदरा उन्हात ठेवल्याने त्याच्या सदर्यातील त्रासदायक स्पंदने पुष्कळ न्यून होऊन त्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली. चाचणीतील दुसर्या साधकाला आध्यात्मिक त्रास नाही; पण त्याच्या सदर्यावर रज-तमात्मक स्पंदनांचे आवरण आले होते. त्याचा सदरा उन्हात ठेवल्याने त्यातील रज-तमात्मक स्पंदने नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली. थोडक्यात दैनंदिन वापरातील कपडे उन्हात ठेवल्याने त्यांची आध्यात्मिक शुद्धी होते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.११.२०२०)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |