सातारा येथे अतिक्रमण विभागाची कारवाई
सातारा, ५ डिसेंबर (वार्ता.) – येथील कुंभारवाडा आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील काही अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ४ डिसेंबर या दिवशी हटवली.
या वेळी काही हातगाडीधारकांवर कारवाई करण्यात आली. पोवईनाका ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवली; मात्र त्यापुढील अतिक्रमणे काढलीच नाहीत. यामुळे नगरपालिका आणि पदपथावर बसणारे, हातगाडीधारक, टपरीचालक यांच्यात अर्थपूर्ण संबंध आहेत कि काय अशी चर्चा नागरिक करत होते.