पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात टिपू सुलतानचे छायाचित्र लावणार्या धर्मांधांना अटक करा !
भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
जळगाव, ५ डिसेंबर (वार्ता.) – पाळधी येथील धर्मांधांनी ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू महिलांवर अत्याचार, मंदिरांचा विध्वंस, हिंदु धर्मावर आघात करणार्या टिपू सुलतानचे छायाचित्र बळजोरीने लावले. कोणतीही अनुमती न घेता हे छायाचित्र कुणाच्या पाठिंब्यामुळे लावले ? ग्रामविकास अधिकार्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ कुणाच्या पाठबळामुळे केली ? पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली येऊन छायाचित्राला कागद चिकटवून पुन्हा कार्यालयात लावले ? असे प्रश्न निवेदनात विचारण्यात आले आहेत. हे निवेदन भाजपच्या वतीने धरणगाव येथील तहसीलदार नितीन देवरे यांना देेण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त घटनेचा भाजपच्या धरणगाव तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हे नोंद करून त्यांना कह्यात घेण्यात यावे; अन्यथा भाजपच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल. याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.