हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉक्टरांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गतमासात ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्राचे अंतर्भूत करणे’ (इंटेग्रेटींग स्पिरिच्युअॅलिटी विथ मेडिसीन) या विषयावर ‘ऑनलाईन वेबिनार’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आम्ही नियमितपणे यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू असे कळवले होते. त्यानुसार २९ नोव्हेंबर या दिवशी पुढे कृती करणार्या डॉक्टरांसाठी अशाच प्रकारचा एक ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी ६२ डॉक्टर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. ज्योती दाभोलकर यांनी मार्गदर्शन केले. शेवटी प्रश्नोत्तर सत्रात बेंगळूरू येथील डॉ. वत्सला काशी आणि डॉ. ज्योती दाभोळकर यांनी जिज्ञासूंच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
या कार्यक्रमात डॉ. ज्योती दाभोलकर यांनी सुख आणि आनंद यातील भेद, आनंदप्राप्तीसाठी नेमकी कोणती साधना करावी, काळानुसार नामजपाचे महत्त्व आणि ‘श्री गुरुदेव दत्त ’ जप कसा करावा यांसह अन्य विषयांवर मार्गदर्शन केले.