पंढरपूरकरांना आजपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल दर्शन
पंढरपूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – पंढरपूरकरांना ५ डिसेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आगाऊ’ नोंदणी न करता थेट घेता येणार आहे. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रहिवासी असल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी सांगितले. ज्या नागरिकांना सकाळी ६ ते ७ या वेळेत दर्शन घेता येणार नाही, त्यांना आगाऊ नोंदणी करून दर्शन घेता येणार आहे. आगाऊ नोंदणी केलेल्या भाविकांना सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत प्रत्येक घंट्याला २५० जण याप्रमाणे दर्शनास सोडण्याचे नियोजन केले असून प्रत्येक दिवशी ३ सहस्र भाविकांना मुखदर्शन दिले जाणार आहे.