शिवमोग्गा येथे धर्मांधांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही ! – कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांची चेतावणी
शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण
शिवमोग्गा (कर्नाटक) – सहन करण्याचीही एक मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडल्यास परिस्थिती आटोक्यात रहात नाही. धर्मांधांच्या गुंडगिरीमुळे शिवमोग्गाचा व्यापार नष्ट होत आहे. धर्मांधांची गुंडगिरी शिवमोग्गा येथे सहन केली जाणार नाही, अशी चेतावणी शिवमोग्गाचे पालकमंत्री ईश्वरप्पा यांनी दिली. येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण झाले असून यात ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. श्री. नागेश यांची विचारपूस करण्यासाठी ईश्वरप्पा येथे आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
ईश्वरप्पा पुढे म्हणाले की,
१. शिवमोग्गा येथे कावेबाज धर्मांध दंगल पसरवण्याचा प्रयत्न करत आले आहेत. युवकांना आम्ही शांत रहाण्यास सांगत आलो आहोत. हिंदु युवक शांतच होते; परंतु आता बजरंग दलाचे सहसंचालक नागेश यांच्यावर योजनाबद्ध रितीने आक्रमण करण्यात आले आहे. एकट्या नागेश यांच्यावर ४ धर्मांध गुंडांनी आक्रमण करून षंढासारखे कृत्य केले आहे.
२. हिंदु समाज किती सहन करायचे, तेवढे सहन करतो. धर्मांधांच्या समाजातील दुष्ट शक्ती आणि बाहेरून आलेल्या समाजविघातक शक्ती यांना शिवमोग्गा शहर शांत असलेले पहावत नाही. या घटनेला कारणीभूत असलेल्या गुंडांना आमचे शासन सोडणार नाही. धर्मांध गुंडांना त्या समुदायाच्या पुढार्यांनी फैलावर घेऊन, समज देऊन शिक्षा करावी. हे तुम्ही न केल्यास सरकार धर्मांधांना शिक्षा करील.
३. ‘धर्मांध तरुणांनाही मार लागला आहे’, असे काहीजण बोलतात; परंतु येथे क्रियेला प्रतिक्रिया झाली आहे, इतकेच. ही घटना पूर्वनियोजित आहे. गोहत्येला विरोध करतो म्हणून नागेशवर आक्रमण करण्यात आले आहे.
हिंदुघातकी प्रशासन !
तहसीलदारांनी ‘दोन जमातींमध्ये दंगल झाली’, असे सांगितले आहे. (ही आहे सर्वत्रच्या प्रशासकीय अधिकार्यांची हिंदुघातकी मानसिकता ! धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून दंगल केली, हेही ते सांगू शकत नाहीत. आता भाजप सरकारने प्रशासनाला वस्तूस्थिती सांगण्याचा आदेश द्यावा ! – संपादक) एकजण जात असतांना चौघांनी येऊन त्याला मारले आहे. ही धर्मांधांची गुंडगिरी आहे, हे तहसीलदारांनी आधी लक्षात घ्यायला हवे. यात हिंदु युवकांची काय चूक आहे? असा प्रश्न ईश्वरप्पा यांनी उपस्थित केला.