देवगड येथे गुटख्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक
८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात
सिंधुदुर्ग – गुटखा आणि पानमसाला यांची अवैध वाहतूक करणार्या टेम्पोसह पोलिसांनी ८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात घेतला. या प्रकरणी टेम्पोचालक नवरतन नामदेव विश्वकर्मा (रहाणार वळकूवाडी, जामसंडे, देवगड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनवडे यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनवडे यांच्या पथकाने केली.