कोल्हापूर येथील जन्मठेपेची शिक्षा भोगणार्या बंदीवानाची कारागृहात हत्या
कारागृहात हत्या होत असतील, तर कारागृह प्रशासन नावाची काही गोष्ट आहे कि नाही, असा प्रश्न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?
कोल्हापूर – पत्नीची हत्या केल्यामुळे मागील ७ वर्षांपासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या उमेश राजाराम सामंत या बंदीवानाची किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कळंबा कारागृहातील २ बंदीवानांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करणार्या दोघांना कह्यात घेण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालयात मृतदेहाची अंतिम तपासणी केली असता, त्याच्या बरगड्यांना इजा झाल्याचा अहवाल आधुनिक वैद्यांनी दिला. वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे. (गुन्हेगारांचा संयम वाढण्यासाठी त्यांना साधना शिकवणे किती आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येते. गुन्हेगारांना केवळ शिक्षा न करता त्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी कारागृहातही धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. – संपादक)