कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाकडे अर्ज

मुंबई – कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने ४ डिसेंबर या दिवशी विशेष ‘पीएम्एलए’ न्यायालयाकडे केली आहे. त्यांची संपत्तीही कह्यात घेण्याची अनुमती अंमलबजावणी संचालनालयाने मागितली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबईतील ‘के.जे. हाऊस’ मधील तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील मालमत्तेसह १५ मालमत्तांवर टाच आणण्याची अनुमती अंमलबजावणी संचालनालयाने मागितली आहे. या सर्वांचे मूल्य अनुमाने ९६ कोटी रुपये इतके आहे. यामध्ये इक्बाल कुटुंबियांच्या ६ अधिकोषांतील खात्यांचाही समावेश आहे.