संयुक्त राष्ट्रांत गांजाला अमली पदार्थ नव्हे, तर औषध म्हणून अनुमती !
भारतासह २७ देशांकडून समर्थन
न्यूयार्क – जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक अमली पदार्थाच्या सूचीतून हटवले आहे. यासाठी झालेल्या मतदानात भारतासह २७ देशांनी गांजाला धोकादायक अमली पदार्थाच्या सूचीतून हटवण्यासाठी समर्थन दिले, तर चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले.
A United Nations commission voted to remove marijuana for medical use from a list of the world’s most dangerous drugs, like heroin. The decision is a symbolic win for advocates of drug policy change. https://t.co/4bzuUMeVzu
— The New York Times (@nytimes) December 2, 2020
‘या मतदानानंतर गांजाच्या औषधी आणि उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे’, असें संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. सध्या ५० पेक्षा अधिक देशांनी गांजाचे वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवले आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्ये येथे वैद्यकीय कारणासाठी गांजाला अनुमती देण्यात आली आहे.