१ सहस्र १०० कोटी रुपयांचा घोटाळा होईपर्यंत झोपलेले पोलीस !
‘पुण्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून अनेक पुरावे शासनाधीन केले आहेत. यात अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडे तहसीलदारांसह विविध सरकारी अधिकार्यांचे १०० हून अधिक बनावट शिक्के आढळून आले आहेत.’