गर्दीच्या वेळीही अधिवक्त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा विचार करा ! – न्यायालय
मुंबई – उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयांच्या नियमित कामकाजाला प्रारंभ झाल्याने अधिवक्ते आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांना गर्दीच्या वेळी उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासास मुभा देण्याचा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. याविषयीची एक याचिका अधिवक्ता संघटनेने उच्च न्यायालयाकडे केली असून त्यावर न्यायालयाने सरकारला वरील सूचना केली आहे. सध्या अधिवक्त्यांना सकाळी ८ च्या अगोदर आणि ११ नंतर रेल्वे प्रवास करण्यास मुभा आहे.
दळणवळण बंदीनंतर आठ मासांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ झाला. उच्च न्यायालयातील ही प्रत्यक्ष सुनावणी सद्य:स्थितीला प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यातच प्रत्यक्ष सुनावणीचे आदेश घोषित होताच प्रत्यक्ष आणि दूरचित्रसंवाद यांच्या माध्यमातील सुनावणीही चालू ठेवण्याची तातडीची मागणी अधिवक्त्यांकडून केली जात आहे.