उत्तरप्रदेशमध्ये दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘माँ बाराही देवी धाम’ होणार
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील लक्ष्मणपुरी ते वाराणसी या मार्गावरील प्रतापगड-बादशाहपूरच्या मधे असणार्या दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव पालटून आता ‘माँ बाराही देवी धाम’ असे करण्यात येणार आहे. याविषयीची अनुमती केंद्र सरकारकडून मिळाली आहे. लवकरच याविषयीची अधिसूचना राज्य सरकारकडून काढण्यात येणार आहे.